लाेहारा शहरातून पाेलिसांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:33 IST2021-04-24T04:33:16+5:302021-04-24T04:33:16+5:30

जनजागृती फेरीला सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झाली. त्यानंतर ही फेरी महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

Paelis pass through the city of Lahara | लाेहारा शहरातून पाेलिसांचे पथसंचलन

लाेहारा शहरातून पाेलिसांचे पथसंचलन

जनजागृती फेरीला सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झाली. त्यानंतर ही फेरी महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौकामार्गे जगदंबा मंदिर परिसरात दाखल झाली. पोलीस वाहनावरील ध्वनिक्षेपकावर कोरोनासंदर्भात जनजागृती व सहकार्याचे आवाहन करण्यात आले तसेच संबंधित अत्यावश्यक सेवा, भाजीपाला दुकाने ११ वाजता बंद होतील, याची खात्री करून त्यानंतर चौका-चौकांत खडा पहारा दिला जाणार आहे. त्यामुळे मनाई आदेशाचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन यावेळी पाेलीस यंत्रणेकडून करण्यात आले. या फेरीत नायब तहसीलदार रणजित शिराळकर, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, उपनिरीक्षक व्ही. बी. कदम, अनिल बोडमवाड, सदाशिव पांचाळ, प्रवीण नळेगावकर, किशोर शेवाळे, हनुमंत पापुलवर, विठ्ठल गरड, विजय कोळी, नवनाथ लोहार, बाळू सातपुते, गणेश काडगावे, श्रीशैल मिटकरी आदी सहभागी झाले हाेते.

Web Title: Paelis pass through the city of Lahara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.