बालाजी अमाइन्सकडून ऑक्सिजन थेरेपी मशीन सुपुर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:58+5:302021-04-24T04:32:58+5:30
जिल्ह्यात वाढत असलेले कोरोना रूग्ण आणि होणारे मृत्यू यावर नियंत्रण आणण्याकरिता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बालाजी अमाइन्स कारखान्याच्या ...

बालाजी अमाइन्सकडून ऑक्सिजन थेरेपी मशीन सुपुर्द
जिल्ह्यात वाढत असलेले कोरोना रूग्ण आणि होणारे मृत्यू यावर नियंत्रण आणण्याकरिता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बालाजी अमाइन्स कारखान्याच्या संचालक मंडळाकडे ऑक्सिजन हाय फ्लो मशीन व बाय पॅप मशीनची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी दोन हाय फ्लो ऑक्सिजन थेरेपी मशीन व दोन बाय पॅप मशीन अशा चार मशीन उपलब्ध करून भेट दिल्या. बालाजी अमाइन्सचे दत्तप्रसाद सांजेकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या ताब्यात सदरील मशीन दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांनी बालाजी अमाइन्सच्या संचालक मंडळाचे व व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांचे आभार मानले. कोरोनाचे गंभीर रूग्ण व श्वसना संबंधी त्रास होत असलेल्या रूग्णांना या ऑक्सिजन हाय फ्लो व बाय पॅप मशीनमुळे मदत होणार आहे.