ऑक्सिजनपूरक वृक्षलागवड मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:25+5:302021-06-22T04:22:25+5:30
कळंब : कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकजण ऑक्सिजन न मिळाल्याने मृत झाले. यापुढील काळात नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा यासाठी ...

ऑक्सिजनपूरक वृक्षलागवड मोहीम
कळंब : कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकजण ऑक्सिजन न मिळाल्याने मृत झाले. यापुढील काळात नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक चोंदे यांनी शिवदत्त मॉर्निंग ग्रुपच्या सहकार्यातून मृत झालेल्या सदस्याच्या नावाने वृक्ष वाटप करण्याचा उपक्रम राबविला. हे वृक्ष ‘त्या’ कुटुंबातील सदस्यांनी संगोपन करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची सुरुवात विश्वंभर शंकरराव उपाडे यांचे वडील कै. शंकर उपाडे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाने करण्यात आली. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत ऑक्सिजन देणारी वृक्ष लागवड करण्यासाठी पाचशे झाडे विविध कार्यालयात व कुटुंबांना भेट देण्यात आली.
यावेळी शिवदत्त मॉर्निंग योगा ग्रुपचे उपाध्यक्ष बबनराव ऊर्फ ज्योतिबा पांचाळ, सचिव नेताजी देशमुख, विक्रम गायकवाड, ज्ञानोबा वळेकर, बोबडे गुरुजी, चंद्रकांत तांबडे, बळिराम काळे, माजी सैनिक अरुण काळे, विश्वंभर उपाडे, प्रा. डॉ. लंकेश्र्वर थोरात, प्रा. गपाट, सुशील पाटील, बाळासाहेब धस, डॉ. अभिमन्यू मेटे, डॉ. गोरे, अभिमन्यू तांबडे, प्रा. ईश्वर राठोड, उद्योजक दुरगुडे, ऋषिकेश चोंदे, अजित उपाडे, आदी उपस्थित होते.