प्राणवायू फाउंडेशनकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST2021-06-19T04:22:09+5:302021-06-19T04:22:09+5:30
तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार अस्लम जमादार, प्राणवायू फाउंडेशनचे रवि नरहिरे यांच्या हस्ते रोटरीचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी व ...

प्राणवायू फाउंडेशनकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन
तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार अस्लम जमादार, प्राणवायू फाउंडेशनचे रवि नरहिरे यांच्या हस्ते रोटरीचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी व सचिव डॉ. सचिन पवार यांच्याकडे या मशीन हस्तांतरित करण्यात आल्या. त्याचबरोबर काही ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, अडल्ट नोजल मास्क, सर्जिकल ग्लोज आणि पीपीई कीट्सदेखील हस्तांतरित करण्यात आल्या. या छोटेखानी कार्यक्रमास रोटरीचे नूतन अध्यक्ष धर्मेंद्र शहा, शिशिर राजमाने, रवि नारकर, संजय देवडा उपस्थित होते.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक त्रास होईल असेही सांगण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जशी ऑक्सिजनची अडचण निर्माण झाली तशी तिसऱ्या लाटेमध्ये होऊ नये यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. या सामाजिक जाणिवेतून फाउंडेशनने ही मदत देऊ केली.