काेविड केअरमधील सुविधांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:26 IST2021-05-03T04:26:26+5:302021-05-03T04:26:26+5:30
उमरगा : उमरगा तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नेहमीच सामजिक आणि धार्मिक कार्यात ...

काेविड केअरमधील सुविधांचा आढावा
उमरगा : उमरगा तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नेहमीच सामजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माउली प्रतिष्ठानच्या वतीने आईसाहेब मंगलकार्यालयात १ मे पासून काेविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरला आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम आलंगेकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके, माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने, विजय जाधव, सिद्धेश्वर माने, डॉ. नंदकिशोर पेठसांगवीकर यांच्यासह आकाश चव्हाण, राहुल सुरवसे, मितेश राखेलकर, विष्णू बिराजदार, सुमित घोटाळे, रोहित सूर्यवंशी, विष्णू पांगे, पिंटू मडोळे, स्वप्नील सोनकवडे आदी उपस्थित होते.