शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पुन्हा त्याच अल्पवयीन पीडितेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 16:09 IST

जामिनावर बाहेर येताच गाठले पिडीतेचे घर, आईवडील बाहेर असल्याची संधी साधत पिडीतेवर पुन्हा अत्याचार

धाराशिव : तालुक्यातील एका गावात सुमारे अडीच वर्षांपूर्वी एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने त्याच पीडितेवर अत्याचार केला. याबाबत शनिवारी ढोकी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

ढोकी ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील ८ वर्षीय मुलीचे आईवडील हे मजूर काम करतात. सुमारे अडीच वर्षांपूर्वी गावातीलच ५६ वर्षीय नराधमाने या अल्पवयीन मुलीस एकटी असल्याचे पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या आरोपाखाली तुरुंगात असलेला आरोपी नुकताच जामिनावर सुटला. यानंतर त्याने पुन्हा शुक्रवारी सायंकाळी पीडित मुलीला गाठले. 

तिचे आईवडील हे कामासाठी बाहेरगावी गेल्याने तिच्या घरी जाऊन बिस्किटांचे आमिष दाखवत आरोपीने तिला बाहेर नेले. गावाजवळील एका निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन मुलीवर पुन्हा अत्याचार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने ढोकी ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद