शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकरांचा धमाका; तब्बल सव्वादोन लाखांची लिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 16:27 IST

Osmanabad Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांची विजयाकडे वाटचाल 

Osmanabad Lok Sabha Result 2024 : महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Ninbalkar) यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार निंबाळकर यांना दुपारी २ वाजेपर्यंत ५ लाख ४५ हजार ६७१ मते मिळाली आहेत. त्यांनी तब्बल २ लाख ३६ हजार ४९२ मतांची आघाडी घेतली आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांना ३ लाख ९ हजार १७९ मते मिळाली असून वंचितचे भाऊसाहेब अंधाळकर यांना २३ हजार ९४६ मते मिळाली आहेत. 

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांना महायुतीचे प्राबल्य असलेल्या विधानसभा मतदारसंघातून देखील अपेक्षित मते मिळाली नाहीत. ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल २ लाख ३६ हजार ४९२ मतांची मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 

मताचा वाढलेला टक्का ओमराराजे यांच्या पथ्यावरमहायुतीमध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसला सुटली होती. यामुळे भाजपाचे आमदार राणा जगजितसिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये घेऊन मैदानात उतरविण्यात आले होते. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले. सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या या लोकसभेसाठी ६३. ८८ टक्के मतदान झाले होते.

टॅग्स :osmanabad-pcउस्मानाबादlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४omraje nimbalkarओमराजे निंबाळकर