‘सिलाई सोशल विक’ सामाजिक उपक्रमाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:14 IST2021-02-05T08:14:19+5:302021-02-05T08:14:19+5:30
सिलाई जिद्द पुरस्काराचे वितरण सोलापूर : सिलाई वर्ल्डचे संस्थापक दादा गुजर यांच्या वाढदिवसानिमित्त सिलाई वर्ल्डतर्फे १७ ते २३ जानेवारी ...

‘सिलाई सोशल विक’ सामाजिक उपक्रमाचे आयोजन
सिलाई जिद्द पुरस्काराचे वितरण
सोलापूर : सिलाई वर्ल्डचे संस्थापक दादा गुजर यांच्या वाढदिवसानिमित्त सिलाई वर्ल्डतर्फे १७ ते २३ जानेवारी हा ‘सिलाई सोशल विक’ साजरा करण्यात आला. लायन्स क्लब पुणे सारसबाग डायलिसिस सेंटर, महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान यांना आर्थिक मदत तसेच सेवाधाम वृद्धाश्रम सिंहगड येथील वृद्धाश्रमात त्यांच्यासाठी संगीताचा कार्यक्रम, तसेच त्यांच्याबरोबर सहभोजन त्यांना आर्थिक सहाय्य आणि त्यांच्यासाठी उबदार ब्लँकेटची भेट देण्यात आली.
बारामतीमधील ओंकार वृद्धाश्रमात अशाच प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. पुण्यातील ममता फाउंडेशनमधील एचआयव्हीबाधित मुलांसाठी त्यांच्या आवडीचे कपडे व आवडीचे पदार्थ देऊन त्यांचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न केला. दादा गुजर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अनेक अडचणींशी सामना करून आज ‘सिलाई वर्ल्ड’ हे सर्व कुटुंबासाठी असलेले वस्त्रदालन पूर्ण महाराष्ट्रात जिद्दीने उभे केले. अशीच जिद्द समाजामध्ये निर्माण करण्यासाठी ‘सिलाई जिद्द पुरस्काराचे’ आयोजन करण्यात आले होते. २२ जानेवारी रोजी अरण्येश्वर येथील संपूर्ण हॉलमध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे उपस्थित होते. पुण्यातील तीन व नांदेडमधील दोन महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांना शिवण यंत्रे देण्यात आली. त्यांची जिद्द पूर्ण करण्यास या पुरस्काराचा नक्कीच उपयोग होईल, अशा भावना दादा गुजर यांनी व्यक्त केल्या. तर सिलाई वर्ल्ड केवळ व्यवसायच करीत नाही त्याच बरोबर समाजाशी आपले धागे, नाते जोडलेले आहेत. समाजातील दुर्बल जनाबद्दल सामाजिक बांधीलकी आहे. याच भावनेतून ‘सिलाई सोशल विक’चे आयोजन करण्यात आल्याचे सिलाईचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. (वाणिज्य वार्ता)