श्री तुळजाभवानी मंदिर खुले करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:26+5:302021-06-18T04:23:26+5:30
तुळजापूर - सध्या काेराेनाचा संसर्ग ओसरला आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ...

श्री तुळजाभवानी मंदिर खुले करा
तुळजापूर - सध्या काेराेनाचा संसर्ग ओसरला आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रासादिक व्यापारी संजयकुमार बाेंदर यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययाेजना करण्यात आल्या हाेत्या. त्याचाच भाग म्हणून भाविकांसाठी राज्यभरातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे पुजाऱ्यांसाेबतच प्रासादिक दुकानदारांचे प्रचंड हाल हाेत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, सध्या काेराेनाचा संसर्ग ओसरला आहे. त्यामुळे शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुले करावे. ज्यामुळे पुजाऱ्यांसाेबतच प्रासादिक व्यापारी तसेच अन्य विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागेल, असे प्रासादिक व्यापारी संजयकुमार बाेंदर यांनी म्हटले आहे. उपराेक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे. मंदिर खुले न झाल्यास आमच्यासमाेर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.