उमरग्यातील चार गावांत ओपन जीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST2021-06-17T04:22:32+5:302021-06-17T04:22:32+5:30

बातमी व फोटो -------- राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश -------------- उमरगा - जिल्हा क्रीडा विभागामार्फत व्यायाम ...

Open gyms in four villages in Umarga | उमरग्यातील चार गावांत ओपन जीम

उमरग्यातील चार गावांत ओपन जीम

बातमी व फोटो -------- राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश --------------

उमरगा - जिल्हा क्रीडा विभागामार्फत व्यायाम शाळा विकास निधी अंतर्गत उमरगा तालुक्यातील ४ गावांमध्ये ओपन जीम मंजूर करण्यात आल्या आहेत. याकामी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी पाठपुरावा केला हाेता.

उस्मानाबाद जिल्हा क्रीडा विभागामार्फत व्यायामशाळा विकास निधी अंतर्गत युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, व्यसनाधीनता, विविध आजारांपासून युवकांना परावृत्त करण्यासाठी तसेच निसर्गाच्या वातावरणात व्यायामाचा आनंद घेता यावा यासाठी ओपन जीमची संकल्पना राबवण्यात येत आहे. तालुक्यातील बलसूर, मुरळी, भुयार चिंचोली, बेटजवळगा या चार ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयाच्या ओपन जीमचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदरील ओपन जीमच्या मंजुरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला हाेता. त्यानुसार उमरगा तालुक्यातील चार गावांमध्ये ओपन जीम साठी २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामपंचायतीने सुचवलेल्या जागेमध्ये विविध प्रकारच्या कसरतीचे साहित्य बसवण्यात आले आहे.

सदरील गावांमध्ये ओपन जीम मंजूर केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने मुरळीचे सरपंच शमशोद्दीन जमादार, भुयार चिंचोलीचे सरपंच रणजीत गायकवाड, बलसूरच्या सरपंच जयश्री नांगरे, बेटजवळग्याचे उपसरपंच सचिन वाडीकर आदींनी उस्मानाबाद जिल्हा क्रीडा विभाग व प्रा. सुरेश बिराजदार यांचे आभार मानले.

Web Title: Open gyms in four villages in Umarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.