शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे ऑनलाइन बुकिंग अनेकांना ठाऊकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दहा वर्षांपूर्वी बुकिंगची सोय केली आहे. मात्र अनेकांना यासंदर्भात माहितीच नाही ...

उस्मानाबाद : प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दहा वर्षांपूर्वी बुकिंगची सोय केली आहे. मात्र अनेकांना यासंदर्भात माहितीच नाही तर काहींना माहीत असूनही बुकिंग करण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महामंडळाला यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे.

एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी व ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या लांब पल्ल्याच्या बसेसचे आरक्षणाची आकडेवारी कमी असल्याचे चित्र आहे. सध्या खासगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खासगी वाहनांच्या बुकिंगसंदर्भात प्रवाशांना माहीत आहे.

असे करावे ऑनलाइन बुकिंग

महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी एका क्लिकवर तिकिटांचे आरक्षण आरक्षण करता यावे. यासाठी एमएसआरटीसी मोबाईल रिझर्व्हेशन ॲपची निर्मिती केली. या ॲपद्वारे प्रवाशांना हव्या त्या गाडीच्या तिकिटांचे आरक्षण करुन पैसे ऑनलाइन भरता येते.

वेळ अन् पैशाची बचत

एसटी महामंडळाच्या वतीने दहा वर्षांपूर्वी ऑनलाइन बुकिंगची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता यापुढे जात मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बसस्थानकातील सेंटरवर रांगेत थांबावे लागते. त्याउलट मोबाइल ॲप हा प्रवाशांसाठी सोयीचा आहे. या ऑनलाइन प्रणालीतून प्रवाशांचा वेळ, पैशाची बचत होत आहे. ग्रामीण भागात ऑनलाइन प्रणालीची माहिती नसल्याचे चित्र आहे.

रेल्वे प्रवास करताना ऑनलाइन तिकीट मिळत असल्याची माहिती आहे. मात्र एसटीचे तिकीटही ऑनलाइन होते. हे माहीतच नव्हते. तसेही आपण ग्रामीण भागात राहत असल्यामुळे एसटीचे बुकिंग करण्याची मुळीच गरज नाही.

महेश गायकवाड, प्रवासी

मी मागील २० वर्षांपासून एसटी बसने प्रवास करीत आहे. बसस्थानकात बस लागण्यापूर्वी अर्धा तास येऊन बसतो. बसमध्ये जागा उपलब्ध होते. नसेल तर उभे राहून प्रवास करतो. ऑनलाइन बुकिंगबाबत माहिती नाही.

रामदास गाडेकर, प्रवासी

कोट...

उस्मानाबाद आगारातून लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेसचे ऑनलाइन बुकिंग केले जाते. उन्हाळी सुट्टी व सणासुदीच्या दिवसात ५० टक्के बुकिंग होते. तर इतर वेळी १० टक्के बुकिंग असते.

पांडुरंग पाटील, आगारप्रमुख, उस्मानाबाद