शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत तरळले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:27 IST

पंचनामे होईनात, प्रतीक्षा सरकारच्या मदतीची

ठळक मुद्देशेतीचे अर्थकारण कोलमडले 

- बालाजी बिराजदार

लोहारा (जि. उस्मानाबाद) : लोहारा शहरासह तालुक्याला अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. त्यातच दोन वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीनचे ७० टक्के व पावणेदोनशे हेक्टरवरील कांदा वाया गेला आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गाव म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील एकेक शेतकरी १० ते १५ एकरावर कांदा लागवड करतात. भाव असो, वा नसो प्रत्येक वर्षी कांदा लागवड ठरलेलीच. यंदाही सालेगावातील शेकडो शेतकऱ्यांनी सुमारे पावणेदोनशे हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. अधूनमधून पडलेल्या रिमझिम पावसामुळे कांदा पीक जोमदार आले होते. त्यामुळे यंदा कांद्याच्या माध्यमातून आपले भले होईल, म्हणून शेतकरी आनंदात होते. परंतु, अवकाळी पावसाने सर्व स्वप्नांवर पाणी फेरले. कांद्याच्या शेतीत १० ते १५ दिवस पाणी होते. त्यामुळे कांदा जमिनीतच सडला आहे. होत्याचं नव्हतं झालं.  सालेगाव येथील २३ वर्षीय तरुण शेतकरी किरण पाटील यांच्या वडिलांचे २००७ मध्ये निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आईवर आली. किरण व तीन मुलींचा सांभाळ करीत त्यांनी शेतीही सांभाळली. दीड वर्षापूर्वी एका आजाराने किरण यांच्या आईचेही निधन झाले. त्यामुळे लहान वयातच घराची आणि शेतीची जबाबदारी किरण यांच्यावर येऊन ठेपली. परंतु, धीर न सोडता किरण यांनी १५ एकर शेती कसण्यास सुरुवात केली. सध्या ५ एकरावर सोयाबीन, तूर तर साडेचार एकरावर कांदा हे पीक आहे. कांदा लागवडीवर आजवर ३५ हजार रुपये खर्च झाले. कांद्याचे पीक दमदार आले होते. त्यामुळे  चांगला दर मिळून  परिस्थिती सुधारेल, असे वाटत असतानाच तडाखा बसला. ७० टक्के कांदा जमिनीतच सडून गेला. पंचनामे बाकी आहेत. त्यामुळे आता शासनाने भरीव मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी किरण यांनी व्यक्त केली.

जोरदार पिकाला लागली नजरफुलचंद देशपांडे हेही यास अपवाद नाहीत. त्यांना एकूण ८ एकर शेती. दोन एकरात कांदा आणि उर्वरित क्षेत्रात सोयाबीन, तुरीचे पीक घेतले. लागवडीपासून ते आजवर  २१ हजार ४०० रुपये खर्च झाले. पीकही जोरदार होते, परंतु परतीच्या पावसात हे पीक आठ दिवस पाण्यात राहिले. त्यामुळे पात पिवळी पडली आणि कांदाही सडला. परिणामी, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता आम्ही करायचे तरी काय? असा सवाल शेतकरी देशपांडे यांनी केला.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती