जुन्या भांडणावरून एकावर तलवारीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:31+5:302021-06-28T04:22:31+5:30
मुरुम-मागील भांडणाची कुरापत काढून जवळपास अकरा जणांच्या टाेळक्याने ४० वर्षीय व्यक्तीवर तलवारीने वार केले. तसेच लाेखंडी गजाने बेदम मारहाण ...

जुन्या भांडणावरून एकावर तलवारीने वार
मुरुम-मागील भांडणाची कुरापत काढून जवळपास अकरा जणांच्या टाेळक्याने ४० वर्षीय व्यक्तीवर तलवारीने वार केले. तसेच लाेखंडी गजाने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी रात्री मुरूम शहरातील डागा हाॅस्पिटलसमाेर घडली. जखमी व्यक्तीवर साेलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुरूम ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा नाेंद करण्यात आला. यापैकी आठजण उमरगा तर उर्वरित तिघे आळंद तालुक्यातील असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
शहरातील मेहताब अजीम शेख (वय ४०) आणि जाकीर अय्युब हुसेन बागवान यांच्यात मागील नऊ ते दहा महिन्यांपासून घरगुती वाद आहेत. याच प्रकरणावरून यापूर्वीही एकमेकांत वाद झाल्याने परस्पर विरोधी तक्रारीवरून मुरूम पाेलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मेहताब शेख हे शनिवारी रात्री शहरातील डागा हॉस्पिटल शेजारील मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी आले असता दबा धरुन बसलेल्या ११ जणांनी अचानक शेख यांच्यावर तलवार आणि लोखंडी गजाने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने मेहताब हे जीव वाचविण्यासाठी मेडिकलमध्ये शिरले. यानंतर उपस्थित लाेकांनी मध्यस्थी करून वाद साेडविला केली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. यानंतर जखमी शेख यांना तातडीने मुरूम उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मेहताब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जाकीर अय्युब हुसेन बागवान, इब्राहिम इस्माईल बागवान, नदीम इनामदार (तिघे रा. मुरूम, ता.उमरगा), जाकीर महेबूब अत्तार, इस्माईल महेबूब अत्तार, जाफर महेबूब अत्तार (तिघे रा.खजुरी, ता. आळंद, कर्नाटक), नागेश मंडले, अविनाश मंडले, किरणदास मंडले, अभिषेक मंडले, कबीरदास मंडले (सर्व रा. अनंतपूर ता.उमरगा) यांच्यावर मुरूम पोलीस ठाण्यात कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि आर. एम. जगताप, सपोनि यशवंत बारवकर करीत आहेत. आराेपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कर्नाटकातील खजुरी व उमरगा तालुक्यातील अनंतपूर येथे गेले आहे. असे असेले तरी रविवारी सायंकाळपर्यंत एकही आराेपी पाेलिसांच्या हाती लागला नव्हता.