ग्रामसेविकेच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST2021-06-19T04:22:30+5:302021-06-19T04:22:30+5:30
कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामसेविका उज्जला झगडे या २०१९ पासून ग्रामसेविका पदावर रुजू झाल्या आहेत. तेव्हापासून त्यांना तांदुळवाडी ग्रामपंचायतचे ...

ग्रामसेविकेच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल
कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामसेविका उज्जला झगडे या २०१९ पासून ग्रामसेविका पदावर रुजू झाल्या आहेत. तेव्हापासून त्यांना तांदुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच दीपाली नितीन काळे यांचे पती नितीन काळे हे जीएसटीची बिल पावती न देता रकमेची मागणी करीत हाेते. रक्कम न दिल्यास तुझी नोकरी घालवतो, तुझी बदली करतो असे धमकावत होते. तसेच नितीन काळे यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या नोटीस बुकवर खाडाखोड केली व विकास कामाचे विषय खोडून ‘ग्रामसेवकाची बदली करा’ असे विषय टाकले.
यानंतर ६ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावून ग्रामसेविका उज्ज्वला झगडे यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी उज्जला झगडे यांच्या फिर्यादीवरून नितीन काळे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम-३५३ सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.