ओबीसी आरक्षण; प्रशासनाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:19+5:302021-07-07T04:40:19+5:30
जय मल्हार आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय अधिकारी, ...

ओबीसी आरक्षण; प्रशासनाला निवेदन
जय मल्हार आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, ओबीसीची जातनिहाय जणगनना करावी, अशा मागण्याही केल्या आहेत. यावर बारा बलुतेदार असलेल्या साळी, माळी, कोळी, कोष्टी, चांभार, न्हावी, बागवान, सुतार, सुवर्णकार आदी समाजातील प्रतिनिधींच्या सह्या आहेत. निवेदन देताना धनगर समाज जय मल्हार आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कांबळे, माळी महासंघाचे बालाजी माळी, माजी नगरसेवक सोपान वरवडे, मुस्लीम समाजाचे आसिफ जमादार, शंकर खामकर, रवी माळी, इक्बाल तांबोळी, महावीर चोरमले, राम बाबर, खालेद बागवान, सुनील आसलकर, नगरसेवक सागर टकले, तौफिक कुरेशी, राम बागडे, दादा राऊत, चौघरी, विशाल माळी, बालाजी कुटे, मुकुंद वाघमारे, सतीश माळी, महादेव वेदपाठक, बाजीराव मारकड, जिवराज कुटे, रामराव खोडकर, सुनील माळी आदींची उपस्थिती होती.
050721\1528-img-20210705-wa0067.jpg
ओबीसी आरक्षण कायम ठेवावे यासाठी उपविभाग अधिकारी कार्यालय येथे निवेदन देताना मल्हार आर्मीचे अध्यक्ष सुरेश भाउ कांबळे बालाजी माळी नगरसेवक सागर टकले राम बागडे आण्णा माळी