रुग्णसंख्येने विशी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST2021-04-07T04:33:31+5:302021-04-07T04:33:31+5:30

मुरुम : शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घालणे सुरु केले असून, शहरातील दुसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या आता २१ वर ...

The number of patients exceeded twenty | रुग्णसंख्येने विशी ओलांडली

रुग्णसंख्येने विशी ओलांडली

मुरुम : शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घालणे सुरु केले असून, शहरातील दुसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या आता २१ वर पोहचली आहे. सध्या १३ रुग्ण उपचाराखाली आहेत. आतापर्यंत सात जणांना उपचारानंतर बरे झाल्याने सुटी मिळाली असून, एका ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान उस्मानाबाद येथे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाला रोखण्यासाठी नगरपरिषद, पोलिस आणि आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, अनेक नागरिक नियम पायदळी तुडवत असल्याने शहाराची रुग्ण संख्या दिवसागणिक वाढतच आहे. शहरात सुरुवातीला यशवंतनगर भागात ४ मार्च रोजी दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर याच भागात पुन्हा एक रुग्ण आढळला. २२ मार्च नंतर शहराची रुग्ण संख्या वाढतच गेली. सोमवारपर्यंत शहरात २१ रुग्ण आढळून आले असून, यात मुदकण्णा गल्लीतील दोन, अशोक चौकमध्ये सर्वाधिक चार, नेहरुनगर, सोनार गल्ली, सुभाष चौक प्रत्येकी दोन, झुरळे गल्ली, भीमनगर, धनगर गल्ली, शास्त्रीनगर, मेनरोड, नगरपरिषद येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यातील सात जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. एका महिलाचा उस्मानाबाद येथे मृत्यू झाला तर उर्वरीत १३ ॲक्टीव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्यसरकारकडून मंगळवारपासून नियम अधिक कडक करण्यात आले असून, याची अमंलबजावणी करण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी व पोलीस प्रशासनाकडून शहरवासीयांना आवाहन करण्यात आले. या आवाहानाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना दिवसभर बंद ठेवल्या. यामुळे शहरातील बाजारपेठेतील गर्दी काही अंशी कमी झाल्याचे दिसून आले.

कोट.......

सरकारच्या आदेशानूसार शहरवासीयांनी स्वत:हून नियम पाळावेत. नियम तोडून दंड भरुनही नागरीकांना कोरोना विषयी गांभिर्य राहिलेले नाही. विनाकारण गर्दी करुन नागरिक स्वत:हून कोरोनाला निमंत्रण देत आहेत. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

- यशवंत बारवकर, सपोनि

Web Title: The number of patients exceeded twenty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.