वाशी - पीक पेऱ्यांची अद्ययावत माहिती संकलित व्हावी, यासाठी ई-पीक पाहणी ॲप तयार केले आहे. या ॲपवर आता शेतकरीही शेतातील पिकांची माहिती नाेंदवू शकणार आहेत. यासाठी १२ ऑगस्ट राेजी तहसील कार्यालयातील तलाठी तसेच कृषी सहाय्यक यांना प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सहाय्यक व तहसील कार्यालयातील तलाठी यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आले हाेते. यावेळी तालुका कृषी अधिकारी संताेष काेयले यांच्यामार्फत शेतकऱ्यांना माेबाइलमधील ई-पीक पाहणी ॲपची माहिती दिली. क्षेत्रिय स्तरावरून पीक पेरणी अहवालाची माहिती संकलित व्हावी व या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी हे ॲप आणले त्यांनी आवर्जुन सांगितले. या पीक पाहणी कार्यक्रमानुसार १ ते १४ ऑगस्ट प्रचार-प्रसिद्धी, १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर नाेंदणी, फाेटाेसह माहिती अपलाेड करणे, १६ ते ३० सप्टेंबर नमुना पडताळणीस अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. दरम्यान, एका मोबाइल क्रमांकावरून २० खाते अपलोड करता येणार असल्याची माहिती या प्रशिक्षणात तहसीलदार नरसिंग जाधव व तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी दिली़