शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'केवळ 'अंधभक्त'च नाही, तर भाजपा खासदारही अशी तुलना करतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 17:12 IST

भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी गृहमंत्री अमित शहांना एक पेटींग फोटो भेट दिला आहे

मुंबई - 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून राज्यात गदारोळ माजला होता. या पुस्तकाच्या लेखकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना चक्क छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्यानंतर, महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि शिवभक्तांकडून लेखक गोयल यांचा निषेध नोंदविण्यात आला होता. मात्र, आता, भाजपाच्या एका खासदाराने अमित शहांची तुलना चक्क सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली आहे. 

भाजपाखासदार तेजस्वी सूर्या यांनी गृहमंत्री अमित शहांना एक पेटींग फोटो भेट दिला आहे. त्यामध्ये, सरदार वल्लभभाई पटेल यांचा आणि अमित शहांचा अर्धा-अर्धा फोटो दिसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. ''युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्याच्या कुटील कारस्थानानंतर आता भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी अमित शहा यांची तुलना करण्याचे धाडस केवळ अंधभक्तच नाही तर भाजपाच्या अनुयायी खासदारांकडूनही होत आहे'', असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुक पेसजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या या निषेध पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.  

दरम्यान, आज के शिवाजी - नरेंद्र मोदी या पुस्तकातील वादात, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता भाजपवासी झालेले छत्रपती उदयनराजे यांच्यासह संभाजी राजे, शिवेंद्रसिंहराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे हे शांत झालं अस वाटत असताना भाजपच्या माजी आमदाराने पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाजारांचा सन्मान असल्याची मुक्तफळे भाजप नेत्यांने उधळली होती. त्यामुळे, आता हा नवीन वाद उफाळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMember of parliamentखासदारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAmit Shahअमित शाह