'त्या' औषधीत छापील घटकद्रव्ये आढळली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:42+5:302021-06-03T04:23:42+5:30

हिमाचल प्रदेशातील लाइफ व्हिजन हेल्थकेअर या औषधी उत्पादक कंपनीने उत्पादित केलेल्या एका औषधीची कळंब येथील कंपनी मार्केटिंग करीत होती. ...

No printed ingredients were found in 'that' medicine | 'त्या' औषधीत छापील घटकद्रव्ये आढळली नाही

'त्या' औषधीत छापील घटकद्रव्ये आढळली नाही

हिमाचल प्रदेशातील लाइफ व्हिजन हेल्थकेअर या औषधी उत्पादक कंपनीने उत्पादित केलेल्या एका औषधीची कळंब येथील कंपनी मार्केटिंग करीत होती. औषध निरीक्षक विलास दुसाने यांनी कळंब येथील या कंपनीच्या कार्यालयात १८ जून २०२० रोजी जाऊन त्या औषधीचे 'सॅम्पल्स' घेतले होते.

सदर नमुना अन्न व औषधी प्रशासनाच्या औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी पाठविला. तपासणीअंती २३ ऑक्टोबर २०२० रोजी यात गोळ्याच्या पाकिटावर असलेले छापील घटकद्रव्ये कमी मात्रेत आढळून आली होती, शिवाय न दर्शविलेला एक घटक टॅबलेटमध्ये अंतर्भूत असल्याचा अहवाल आला होता. त्यामुळे कंपनीस नोटीस बजाविल्यानंतर उत्पादक कंपनीने औषध निष्कर्ष अमान्य करीत फेरतपासणीची मागणी केली होती. यानुसार कळंब न्यायालयात संबंंधितांनी याचे शुल्क भरणाही केले. त्यामुळे हा नमुना कोलकता येथील केंद्रीय औषधी प्रयोगशाळेत फेरतपासणीसाठी पाठविण्यात आला. नुकताच या प्रयोगशाळेचाही अहवाल आला असून, यात संबंधित उत्पादकाच्या औषधीला अप्रमाणित ठरविले आहे. यामुळे आता याप्रकरणी पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

दर्शविलेल्या औषधींची मात्रा कमी...

औषध निरीक्षक विलास दुसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीच्या पाकिटावर एसिक्लोफेनिक १०० एमजी, पॅरासिटामोल ३२५ एमजी, तर सिरॉशियोजपेप्टिडेज याची १५ एमजी, अशी घटकमात्रा दर्शविली होती. कोलकता येथील केंद्रीय औषधी प्रयोगशाळेत फेरतपासणी केली असता उपरोक्त तीनही औषधींची मात्रा अनुक्रमे कमी आढळली आहे. शिवाय, याच टॅबलेटमध्ये डायक्लोफेनिक या घटकाची मात्रा आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहेे.

Web Title: No printed ingredients were found in 'that' medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.