ना काॅल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:23+5:302021-06-20T04:22:23+5:30
उस्मानाबाद : मेहनत न करता पैसे मिळविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहेत. उल्लेखनीय ...

ना काॅल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब !
उस्मानाबाद : मेहनत न करता पैसे मिळविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहेत. उल्लेखनीय म्हणजे ना काॅल ना, ना ओटीपी तरी बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी ॲप डाऊनलोड 'ऑटो रिड ओटीपी' परमिशनची परवानगी घेतली जात आहे. यामधूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असल्याचा किंवा एटीएम ग्राहक सेवा सेवा केंद्रातून बोलत आहोत, असे सांगून ग्राहकांना काॅल येत होता. त्यानंतर तुमचे एटीएम कार्ड बंद होणार आहे, असे सांगून ते सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत बंद झाली आहे. डिजिटल युगात साॅफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत. गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये २४ फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या, तर जून २०२१ पर्यंत १२ जणांची फसवणूक झाली आहे. ३६ प्रकरणांपैकी २२ प्रकरणातील रक्कम नागरिकांना परत मिळाली आहे.
पैसे परत मिळविण्याची शक्यता कमीच
पूर्वी हॅकरकडून २४ तासांत पैसे परत मिळविता येत होते. आता हॅकरने आपली पद्धती बदलविली आहे.
आपल्या खात्यातून जसे पैसे चोरीला गेले त्याच क्षणी सायबर सेलशी संपर्क केला पाहिजे. यामुळे पैसे परत मिळणे शक्य होते.
ठगविणारे नागरिक वळते केलेले पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यातून तिसऱ्या खात्यात असे नऊ दहा वेळेस करतात.
या परिस्थितीत प्रकरण तात्काळ पुढे आले तर असे पैसे वळते करताना बँकांना नोटीस बजावून पैसे रोखता येतात.
ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे
२०२०
२४
जून २०२१
१२
एकूण
३६
५०००००
रुपयांची होते दरवर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणूक
काम न करता पैसे मिळविण्यासाठी अनेक जण ऑनलाइन ॲपचा वापर करून ठगगिरी करीत आहेत. ओटीपी शेअरिंग, क्रेडिट कार्ड ॲक्टिव्हेटे करण्याच्या बहाण्याने पैसे लुटणे. समाज माध्यावर नागरिकांशी ओळख करून अडणीत असल्याची बतावणी करून खात्यावर पैसे वर्ग करण्यास सांगणे, अशा विविध प्रकारे नागरिकांची फसवणूक केली जात आहे. वर्षाकाठी सुमारे ५ लाख रुपयांची फसवणूक होत आहे.
अनोळखी ॲप नकोच
डिजिटल युगात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजारात डिजिटल ॲप आले आहेत. नागरिकही नवनव्या ॲपला भुलून ते ॲप डाऊनलोड करीत असतात. मात्र, काही ॲप डाऊनलोड केल्यानंतर माहिती चोरली जाण्याची दाट शक्यता असते.
समाज माध्यमांवर विविध प्रकारचे संदेश प्रसारित करून त्याची लिंक ओपन करण्यास नागरिकांना भाग पाडले जाते. लिंक ओपन झाल्यानंतर वैयक्तिक माहिती विचारली जाते. अशी माहिती नागरिकांनी देणे टाळावे, असे सायबर सेलकडून सांगण्यात आले.
कोट...
नागरिकांची ॲप व विविध साइटद्वारे ओटीपी विचारून फसणुकीचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी ॲप तसेच साइटचा वापर सावधपणे करणे गरजेचे आहे. माहिती विचारल्यानंतर नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. फसवणूक झाल्यानंतर २४ तासांच्या आता संबंधित पोलीस ठाणे किंवा सायबर सेलकडे तक्रार द्यावी.
अर्चना पाटील, सायबर सेल प्रमुख