शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणे यांना ‘बाप’ माणसाने दिली समज; नारायण राणे म्हणाले, मी नितेशला बोललो...

By चेतनकुमार धनुरे | Updated: June 11, 2025 15:10 IST

मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. तो कोणाचा बाप नसतो : नारायण राणे

धाराशिव : काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथून केलेल्या वक्तव्यानंतर शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी खदखद व्यक्त केली. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनीही वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगून त्यांना समज दिल्याचे बुधवारी तुळजापुरात सांगितले. 

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे बुधवारी तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘नितेशला याबाबतीत मी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणे चुकीचेच आहे. याबद्दल समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. तो कोणाचा बाप नसतो. मीही मुख्यमंत्री राहिलो आहे. तेव्हा लोक मला साहेब म्हणायचे. मात्र, मी त्यांना सांगायचो की, मी जनतेचा सेवक आहे. साहेब म्हणू नका’, असे सांगत नितेश यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न वडील नारायण राणे यांनी केला.

दरम्यान, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यावर बोलताना ते म्हणाले, ‘प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे. त्याला कोण विचारतंय’, असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर नारायण राणे म्हणाले, ‘ते एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा.’

फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समजराज्यात भाजपाचे सरकार असून, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी स्वतः याबाबत मला सांगितले की माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावर मी त्यांना सांगितले की, तुमच्या मनात काहीही अर्थ असला तरी राजकारणात लोकांमध्ये त्या वक्तव्याचा काय अर्थ जातो, ते अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने अशा प्रकारे बोलणे योग्य नाही. ही बाबत त्यांनी मान्य केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना