नववी ते बारावीच्या वर्गाची अजूनही ३५ टक्केच उपस्थिती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:15+5:302021-01-08T05:43:15+5:30
उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत; परंतु महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लाेटला ...

नववी ते बारावीच्या वर्गाची अजूनही ३५ टक्केच उपस्थिती...
उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत; परंतु महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लाेटला असतानाही शाळांतील पट अपेक्षित गतीने वाढताना दसत नाही. आजघडीला ८० हजार २९२ पैकी २८ हजार ४०७ म्हणजेच ३५ विद्यार्थीच शाळेत दाखल झाले आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी आता शिक्षण विभागाने विशेष उपाययाेजना हाती घेणे गरजेचे आहे.
काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर साधारण २३ नाव्हेंबर २०१९ पासून नववी ते बरावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळांची संख्या साधारण ४९१ एवढी आहे. यापैकी ४६२ शाळांतील वर्ग भरविण्यात येत आहेत. या सर्व वर्गांची मिळून विद्यार्थीसंख्या ८० हजार २९२ एवढी आहे. ४ जानेवारी अखेर २८ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे. याचे प्रमाण ३५ टक्केच आहे. ही बाब लक्षात घेऊन आता शिक्षण विभागाच्यावतीने पालकांच्या घरी जावून मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले जात आहे, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून काेणकाेणत्या उपाययाेजना केल्या जात आहेत, त्याचीही माहिती दिली जात आहे.
चाैकट...
४९१
नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण शाळा
४६२
सुरू असलेल्या शाळा
८०२९२
एकूण विद्यार्थी
२८४०७
विद्यार्थ्यांची उपस्थिती
महिनाभरात जिल्ह्यात एकही विद्यार्थी नाही संक्रमित
शाळा भरविल्यानंतर विद्यार्थी काेराेना संक्रमित हाेतील, अशी भीती अनेकांनी बाेलून दाखविली हाेती; परंतु सरकारच्या निर्देशानुसार सर्वच शाळांकडून खबरदारीचा भाग म्हणून सॅनिटाझर, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सक्त सूचना केल्या आहेत. त्यामुळे काळजी घेतली जात आहे. परिणामी, आजवर एकही विद्यार्थी संक्रमित झाला नाही, हे विशेष.
राज्य सरकारने नववी ते बारावीचे वर्ग भरविण्यास अनुमती दिल्यानंतर सर्व शाळांच्या संबंधित मुख्याध्यापकांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या हाेत्या, तसेच शिक्षकांच्या चाचण्या करूनच त्यांना वर्गावर पाठविले हाेते. त्यामुळे आपल्याकडे आजवर एकही विद्यार्थी संक्रमित आढळलेला नाही. ही आपल्या दृष्टिकाेनातून दिलासादायक बाब मानली पाहिजे.
-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.
सुरुवातीच्या दिवशी अवघे पाच ते हजार विद्यार्थीच वर्गात आले हाेते. यानंतर सातत्याने उपस्थिती वाढत गेली.