इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST2021-09-07T04:39:34+5:302021-09-07T04:39:34+5:30

देशात महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती वापरासाठी आवश्यक सर्व वस्तू महागल्या आहेत. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. केंद्र ...

NCP's agitation against fuel price hike | इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदाेलन

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदाेलन

देशात महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती वापरासाठी आवश्यक सर्व वस्तू महागल्या आहेत. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. केंद्र सरकार मात्र जनतेची थेट लूट करीत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर कर बसवून हे इंधन आणखी महाग केले आहे. या इंधन दरवाढीच्या विराेधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन केले. आंदाेलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. डॉ. संजय कांबळे, भास्कर खोसे, सुरेश टेकाळे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, शहराध्यक्ष मुसद्दिक काझी, सागर मुंडे, किरण मस्के, बाळासाहेब शिंदे, महम्मद चाऊस, अतिक पठाण, नगरसेवक सुभाष पवार, शकील काझी, अविनाश घोडके, ॲड. त्रिंबक मनगिरे, विलास करंजकर, नारायण चोंदे, महेबूब शेख, बाळासाहेब कथले, महेश पुरी, मक्सुद बागवान, सरफराज मोमिन, उमेश मडके, रणजीत खोसे, नीलेश पोतदार, हुजेब बागवान, राहुल कसबे, शोभा मस्के, सलमा सौदागर, मुन्नी सय्यद आदी उपस्थित हाेते.

Web Title: NCP's agitation against fuel price hike