तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयास राष्ट्रीय नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST2021-06-17T04:22:39+5:302021-06-17T04:22:39+5:30
फाेटाे आहे... तुळजापूर : केंद्र शासनाच्या लक्ष्य कार्यक्रमांतर्गत तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूतिगृह व शस्त्रक्रियागृहाची पाहणी फेब्रुवारी महिन्यामध्ये राष्ट्रीय पथकामार्फत ...

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयास राष्ट्रीय नामांकन
फाेटाे आहे...
तुळजापूर : केंद्र शासनाच्या लक्ष्य कार्यक्रमांतर्गत तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूतिगृह व शस्त्रक्रियागृहाची पाहणी फेब्रुवारी महिन्यामध्ये राष्ट्रीय पथकामार्फत करण्यात आली होती. त्यानुसार, प्रसूतिगृहास ८९.८ टक्के तर शस्त्रक्रियागृहास ७९.५८ टक्के गुणांकन प्राप्त झाल्याने, रुग्णालयास राष्ट्रीय नामांकन मिळाले आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्लीमार्फत राज्यात लक्ष्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण रोखणे, शासकीय आरोग्य संस्थामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदार मातांना सर्व सोईसुविधा देणे, त्यांची प्रसूती सुरक्षितपणे व्हावी, याविषयी प्रसूतिगृह व शस्त्रक्रियागृहातील सुधारणांची पाहणी कोरोनाच्या संक्रमणामुळे २२ फेब्रुवारी, २०२१ मध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राष्ट्रीय स्तरावरील पथकाने केली होती.
यावेळी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या साेईसुविधा, स्वच्छता, प्रसूती संदर्भातील काैशल्य व ज्ञान याची माहिती देण्यात आली हाेती, तसेच माता मृत्युदर शून्यावर आल्याचेही पथकाच्या निदर्शनास आणून दिले हाेते. त्यानुसार, प्रसूतिगृहास ८९.८ टक्के व शस्त्रक्रियागृहास ७९.५८ टक्के गुणांकन प्राप्त झाले हाेते. या गुणांच्या बळावरच उपजिल्हा रुग्णालयास राष्ट्रीय नामांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारमधील अप्पर सचिव वंदना गुरणानी यांनी ही बाब पत्राद्वारे कळविली आहे.
चाैकट...
प्रसूतिगृहासह शस्त्रक्रियागृहाची साधारपणे फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील पथकाने पाहणी केली हाेती. उपजिल्हा रुग्णालयातील आराेग्य कर्मचारी, अधिकारी यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे दाेन्ही घटकांना उत्तम गुणांकन झाले. परिणामी, रुग्णालयास राष्ट्रीय स्तरावरील नामांकन प्राप्त झाले. ही आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.
- डाॅ.चंचला बाेडके, वैद्यकीय अधीक्षिका, तुळजापूर.