लागवड केलेल्या वृक्षांना दिली मृत व्यक्तींची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST2021-06-24T04:22:31+5:302021-06-24T04:22:31+5:30
शिराढोणच्या सर्वज्ञ प्रतिष्ठानचा पुढाकार शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षभरापासून गावात शंभर वृक्षांचे रोपांची ...

लागवड केलेल्या वृक्षांना दिली मृत व्यक्तींची नावे
शिराढोणच्या सर्वज्ञ प्रतिष्ठानचा पुढाकार
शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षभरापासून गावात शंभर वृक्षांचे रोपांची जोपासना करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे स्मरण राहावे, यासाठी या झाडांना त्यांची नावे देण्यात आली आहेत.
सर्वज्ञ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण पाटील यांनी गतवर्षी गावातील राजमाता जिजाऊ शाॅपिंग सेंटर परिसर, आदर्श जिल्हा परिषद शाळा रस्ता, सार्वजनिक स्मशानभूमी परिसरात विविध वृक्षांची लागवड केली होती. त्याला लोखंडी जाळीचे कुंपण लावून, नियमित पाणी देऊन चांगली जोपासना केली. सध्या या झाडांची उंची चार ते पाच फुटांपर्यंत झाली आहे. दरम्यान, मागील वर्षीपासून कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला असून, शिराढोण येथेही अनेकांचे या आजारामुळे निधन झाले. त्यामुळे या व्यक्तींचे स्मरण ठेवून प्रत्येकाने आणखी वृक्षलागवड करावी, यासाठी पाटील यांनी लागवड केलेल्या या वृक्षांना निधन झालेल्या व्यक्तींची नावे देण्याचा उपक्रम हाती घेतला.