राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नाईकवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:32 IST2021-04-08T04:32:33+5:302021-04-08T04:32:33+5:30

भूम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूम शहराध्यक्षपदी विनोद नाईकवाडी यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला. येथील ...

Naikwadi as the city president of NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नाईकवाडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नाईकवाडी

भूम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूम शहराध्यक्षपदी विनोद नाईकवाडी यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला. येथील शिवाजी खरेदी- विक्री संघात माजी आमदार राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूम शहराध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी विनोद नाईकवाडी यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात देऊन मोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवाजी खरेदी- विक्री संघाचे चेअरमन शहाजी दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हऩमंत पाटुळे, बालाजी कुटे, बाजार समिती अध्यक्ष रमेश मस्कर, रामेश्वरचे उपसरपंच श्रीराम खंडागळे, अलिम शेख, साठे, सत्येंद्र मस्कर, अशोक नलवडे, आबासाहेब मस्कर, रमेश आरगडे, रामदास पाटील, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब नाईकवाडी, मुख्याध्यापक लिमकर, प्रशांत नाईकवाडी, भूषण सावंत, निलेश शिंदे, रोहीत नाईकवाडी आदी उपस्थित होते.

Web Title: Naikwadi as the city president of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.