Hotel Bhagyashree : मागील काही दिवसांपासून हॉटेल भाग्यश्री सोशल मीडियावर व्हायरल आहे. हे एक नॉन व्हेज हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये दररोज अनेक ग्राहक येत असतात. काही दिवसापूर्वी या हॉटेल मालकाने नवीन फॉर्च्युनर गाडी खरेदी केली. या गाडीची चर्चा जोरदार झाली होती. दरम्यान, आता हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नागेश मडके यांनी दिली.
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
नागेश मडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हॉटेल बाहेर उभा होतो. त्यावेळी तिथं आलेल्या एका चारचाकी गाडीतून काही लोक आले. त्यांनी मला त्यांच्यासोबत फोटो काढायचा असल्याचे सांगितले. सेल्फीच्या बहाण्याने मला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले.
गाडीतच नागेश मडके यांना मारहाण केली. ४ ते ५ जणांनी मारहाण केल्याचा आरोप मडके यांनी केला. अपहरण करुन गाडी धाराशिवच्या दिशेने घेऊन गेले. त्यांचा मला जीवे मारण्याचा कट होता असा आरोपही त्यांनी केला.
जीवे मारण्याचा कट होता
"पाच जणांच्या टोळीने मारहाण करुन वडगाव येथे पुलावर फेकून दिले. या घटनेनंतर कुटुंबियांना फोन करुन माहिती दिली. यानंतर मला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले", असंही मडके म्हणाले.