१) या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ...
मार्ग आधीचे भाडे आता
उमरगा-मुंबई ६०० ते ७००; १००० रुपये
उमरगा-पुणे ४०० ते ५००; ६०० ते ७०० रुपये
उमरगा-हैदराबाद ४०० ते ५००; ६०० ते ७०० रुपये
उमरगा येथून लॉकडाऊनच्या काळात केवळ १५ ते २० ट्रॅव्हल्स मुंबई, पुणे व हैदराबाद या मार्गावर धावत हाेत्या. आता ही संख्या जवळपास ६० ते ७० वर पाेहाेचली आहे.
लॉकडाऊनच्या काळात रुटिन सेवा चालू ठेवण्यासाठी पुरेसे प्रवासी नव्हते. मात्र, प्रवाशांसाठी नुकसान होत असतानाही ट्रॅव्हल्स चालू ठेवल्या. आता प्रवासीसंख्या वाढली असून, त्यात केंद्र शासनाकडून इंधन दरवाढ केली जात असल्याने भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्सच्या प्रवास भाड्यात वाढ करावी लागली आहे. प्रवाशांनाही सदरील भाडेवाढ मान्य होत आहे. त्यामुळे बहुतांश प्रवासी ट्रॅव्हल्स प्रवासाला प्राधान्य देत आहेत.
- माधव बिराजदार, ट्रॅव्हल्स मालक.