नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST2021-01-16T04:37:05+5:302021-01-16T04:37:05+5:30
लोहारा : लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ११ व १२ मधील नळाला सुरुवातीला गढून पाणी येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला ...

नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा
लोहारा : लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ११ व १२ मधील नळाला सुरुवातीला गढून पाणी येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, याकडे नगर पंचायत प्रशासनाने लक्ष देऊन स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
ओढ्यावरील पुलावर पडला खड्डा
लोहारा : लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द गावाजवळील ओढ्यावरील पुलावर खड्डा पडला आहे. वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन खड्डा बुजवावा, अशी मागणी सागर पाटील यांनी केली आहे.
अर्धवट शेतरस्त्यामुळे अडचण
लोहारा : लोहारा तालुक्यातील भातागळी येथील अर्धवट शेतरस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यास अडचणी येत आहेत. पावसाळ्यात तर चिखल तुडवून शेत गाठावे लागते. पिकांच्या राशीच्या वेळी वाहनेही घेऊन जात येत नाहीत. त्यामुळे शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.