महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:30 IST2021-03-25T04:30:30+5:302021-03-25T04:30:30+5:30

गुंजोटी : येथील वीज उपकेंद्रातील रखडलेले पाच मेगावॅट क्षमतेच्या नवीन ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्ण करून गाव भारनियमनमुक्त केल्याबद्दल ग्रामस्थांच्या ...

MSEDCL employees felicitated | महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

गुंजोटी : येथील वीज उपकेंद्रातील रखडलेले पाच मेगावॅट क्षमतेच्या नवीन ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्ण करून गाव भारनियमनमुक्त केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महावितरणचे उपकार्यकरी अभियंता राजेंद्र शेंडेकर, सहायक अभियंता शिवराज दहिफळे, प्रधान तंत्रज्ञ युवराज माने, वरिष्ठ तंत्रज्ञ सुशांत कणिरे, वरिष्ठ यंत्रचालक माणिक राठोड यांच्यासह जितेंद्र दुबे, खंडाजी बंडगर, अमोल माशाळे, विलास डोंगरे, राजकुमार पाटील, दत्ता मुगळी, संदीप कोळी, महालिंग माशाळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यासाठी ग्रा.पं. सदस्य शेषेराव खंडागळे, समर्पण संस्थेचे किशोर व्हटकर, युवासेना सचिव उस्मान सय्यद, हुसेन पीरजादे, राजेंद्र कटकधोंड, मनीष कटकधोंड, बशीर बिजापुरे, आकाश शिंदे, भारत मोरे, विशाल व्हटकर, हुसेन हत्ताळे, तन्वीर शेख यांनी पुढाकार घेतला.

Web Title: MSEDCL employees felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.