दुभाजकालगत मातीचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST2021-04-30T04:41:56+5:302021-04-30T04:41:56+5:30

सांगवी मार्डी येथे रक्तदान शिबीर तुळजापूर -तालुक्यातील सांगवी मार्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मंगळवारी रक्तदान ...

Mound of soil near the divider | दुभाजकालगत मातीचे ढीग

दुभाजकालगत मातीचे ढीग

सांगवी मार्डी येथे रक्तदान शिबीर

तुळजापूर -तालुक्यातील सांगवी मार्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मंगळवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी २० जणांनी रक्तदान केले. हिंदू राष्ट्रसेना श्री शिवप्रतिष्ठाण यांच्या वतीने हेे शिबीर घेण्यात आले. यावेळी महेश बागल, अनिल पवार, आदिनाथ पवार, राेहित बागल, मेघराज बागल, अशाेक बागल, अतुल बागल, अविनंद गायकवाड, विलास गायकवाड, महेश गाकयवाड, बालाजी काेकाटे, ज्ञानेश्वर काेकाटे, गणेश भाेसले, याेगेश काळे आदींची उपस्थिती हाेती.

काेविड सहायता कक्षाची केली स्थापना

उमरगा -येथील उपजिल्हा रूग्णालयासमाेर ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने मंगळवारी काेविड सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली. कक्षाचे उद्घाटन तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात काेराेना सेंटर्स नसल्याने शहरामध्ये रूग्णांसह नातेवाईकांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या अशा व्यक्तींची गैरसाेय तसेच हेळसांड हाेऊ नये, या करिता सदरील कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याप्रसंगी ॲड. ख्वाजा शेख, राेटरीचे माजी सचिव प्रा. युसूफ मुल्ला, शंकर बिराजदार, सत्यनारायण जाधव, प्रदीप माेरे, शशी पाटील, शांतय्या स्वामी, विजय चितलीआदीींची उपस्थिती हाेती.

Web Title: Mound of soil near the divider