‘पैसा’ कीटकाचा सोयाबीनवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:19+5:302021-06-22T04:22:19+5:30

(फोटो : संतोष वीर २१) भूम : ग्रामीण भागात ‘पैसा’ (वाणी) नावाने परिचित असलेल्या कीटकाने सध्या सोयाबीन व उडीद ...

‘Money’ pest attacks soybeans | ‘पैसा’ कीटकाचा सोयाबीनवर हल्ला

‘पैसा’ कीटकाचा सोयाबीनवर हल्ला

(फोटो : संतोष वीर २१)

भूम : ग्रामीण भागात ‘पैसा’ (वाणी) नावाने परिचित असलेल्या कीटकाने सध्या सोयाबीन व उडीद पिकावर हल्ला चढविला आहे. यामुळे याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी करताना दिसत आहेत. मात्र, यावर नेमकी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी, याबाबत कुठलेही मार्गदर्शन मिळत नसल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शहरासह तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने पेरणीची लगबग सुरू असून, बहुतांश शेतकऱ्यांनी या हंगामात सोयाबीन व उडीद पिकास पसंती दिल्याचे चित्र आहे. या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा १५ हजार ५०० हेक्टरवर होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. याशिवाय उडिदासाठी ८ हजार २०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कल या दोन पिकांकडे आहे.

तालुक्याच्या काही भागात सोयाबीन हे पीक उगवून वाढीस लागले आहे. परंतु, या पिकावर पैसा (वाणी) नावाच्या कीटकाने हल्ला चढवला आहे. हा कीटक सायंकाळी व सकाळच्या प्रहरी उभ्या पिकाला मधून कुरतडत असून, यामुळे पीक आडवे होऊ लागले आहे. शेतकऱ्यांवर एवढे मोठे संकट उभे असताना या कीटकावर शेतकऱ्यांनी काय फवारणी करावी, याचे मात्र उत्तर कृषी सहायक, कृषी तालुका अधिकाऱ्यांसह कृषीतज्ज्ञांकडेही नाही. यामुळे कृषी विक्रेते देतील ते औषध शेतकरी फवारणी करत असले तरी, याचा कीटकांवर कुठलाच परिणाम होत नाही. त्यामुळे उत्पन्नात घट येते की काय, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत असून, कृषी विभागाने तातडीने या कीटकावरील उपाययोजनांबाबत बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कोट....

माझ्या शेतात एक हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली आहे. परंतु, पैसा (वाणी) कीटकाने पीक मधून कुरतडण्यास सुरुवात केल्याने उभे पीक आडवे होत आहे. कृषी विक्रेत्यांकडून कीटकनाशक आणले आहे. परंतु, त्याचा कसलाच परिणाम दिसत नाही. यामुळे कृषी कार्यालयाच्यावतीने उपाययोजनांबाबत बांधावर येऊन मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

- रणजित साबळे, शेतकरी

200621\4930img_20210620_124156.jpg~200621\4930img_20210620_124107.jpg

कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी~फवारणी

Web Title: ‘Money’ pest attacks soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.