झुडपे काढण्यासाठी मुहूर्त सापडला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:28+5:302021-07-07T04:40:28+5:30
(फोटो : मुकूंद चेडे ०६) वाशी : वाशी ते कळंब रस्त्यालगत ठिकठिकाणी वाढलेल्या झुडपांमुळे तसेच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा ...

झुडपे काढण्यासाठी मुहूर्त सापडला...
(फोटो : मुकूंद चेडे ०६)
वाशी : वाशी ते कळंब रस्त्यालगत ठिकठिकाणी वाढलेल्या झुडपांमुळे तसेच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बांधकाम विभागाने याची दखल घेत रस्त्याची डागडुजी करून ५ जुलैपासून वाहतुकीला अडथळा ठरणारी झुडपे तोडण्याचे काम हाती घेतले. परंतु, तात्पुरत्या स्वरूपात ङागडुजी केलेल्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडत असल्याचे चित्र आहे.
वाशी ते कळंब जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले होते. तसेच वाशीपासून जवळच असलेल्या धनगर ओढ्याजवळील वळणरस्त्यावर वाढलेल्या झुडपामुळे अपघात धोका वाढला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बांधकाम विभागाने रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली. मात्र, झुडपे तोडली नसल्याने अपघाताची शक्यता कायम होती. अखेर, ५ जुलै रोजी जेसीबीच्या साह्याने ही झुडपे काढण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले. यामुळे काहीअंशी अपघाताचा धोका कमी झाला आहे. परंतु, येथून पुढेही अनेक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य कायम आहे़ तसेच पारा चौक ते उंदरे वस्तीनजीक, धनगरवाडा ओढ्यापासून दसमेगाव जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी अद्यापही काही ठिकणी खड्डे असून, ते बुजविण्यात यावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांसह वाहनचालकातून होत आहे़