कोट्यवधींच्या उलाढालीचा मुहूर्त हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:29 IST2021-04-14T04:29:59+5:302021-04-14T04:29:59+5:30

उस्मानाबाद : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याचा मुहूर्त समजला जातो. हिंदू नववर्षाला प्रारंभ होत असल्याने, या दिवसाला विशेष ...

The moment of billions of rupees was lost | कोट्यवधींच्या उलाढालीचा मुहूर्त हुकला

कोट्यवधींच्या उलाढालीचा मुहूर्त हुकला

उस्मानाबाद : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याचा मुहूर्त समजला जातो. हिंदू नववर्षाला प्रारंभ होत असल्याने, या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या सणाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने-चांदी, वाहन खरेदी केली जाते. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंचे दुकाने वगळता, इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे बाजारपेठ शांत होती. परिणामी, दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

दरवर्षी गुढीपाडवा सणाला सणाच्या आठ दिवस अगाेदरपासून बाजारपेठेत नागरिकांची रेलचेल असत. कापड दुकाने, सोन्या-चांदीची दुकाने, तसेच दुचाकी, चारचाकी वाहनाच्या शोरूममध्येही खरेदीसाठी गर्दी होत. साेन्या-चांदीचे दागिने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत. यातून सणाला लाखो रुपयांची उलाढाल होत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह असायचा. गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊमुळे बाजारपेठेतील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. या वर्षी पुन्हा ऐन लग्नसराई व गुढीपाडवा सणाच्या तोंडावर रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले. औषधी दुकाने, मेडिकल, दूध विक्री केंद्र, किराणा दुकाने वगळता, इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीचे दुकाने, कापड दुकाने, वाहनाचे शोरुम बंदच आहेत. परिणामी, दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली. नागरिकांनी दुकाने बंद असल्याने आरोग्याची काळजी घेत साधेपणाने गुढी पाडवा सण घरातच साजरा केला.

चौकट...

बाजारपेठेत तुरळक नागरिक

कडक निर्बंधामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सोन्या-चांदीचे दुकाने, कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे दुकाने बंद आहेत. त्यामुळे नेहमी नागरिकांची रेलचेल असलेल्या बाजारपेठेत मंगळवारी गुढीपाडवा सणादिवशीही गर्दी नव्हती.

कोट...

शहरात लहान-मोठे १०० ते १२५ सोन्याचे दुकाने आहेत. लग्नसराईत प्रतिदिन ३ ते ४ लाख रुपयांची एका दुकानाची उलाढाल होते, तर गुढीपाडव्याला ५ ते ६ लाख रुपयांचा उलाढाल होत होती. गतवर्षीही लग्नसराई व गुढीपाडवा कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये गेला. या वर्षीही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने दुकाने बंद आहेत. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला.

लक्ष्मण उमासे, ज्वेलर्स

गुढीपाडवा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने, या सणाला मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी होती. गुढीपाडव्याला जिल्ह्यात १ हजाराच्या जवळपास दुचाकी विक्री होत. यंदाही अनेकांनी खरेदीसाठी नोंदणी केली होती. मात्र, कडक निर्बंध असल्याने शोरूम बंद आहेत. त्यामुळे यंदा वाहन विक्री झाली नाही.

रूपेश मोदाणी, व्यावसायिक

Web Title: The moment of billions of rupees was lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.