शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य ‘आका’,  सुरेश धस यांचा आणखी एक खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:51 IST

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शनिवारी हा मोर्चा निघाला.

धाराशिव : पाकिस्तानातून भारतात ड्रग्जची तस्करी होत असल्याचे एका कारवाईतून उघड झाले. गुजरातमध्ये ८९० कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. त्यातील कृष्णा सानप व दत्ता आंधळे हे दोन आरोपी वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. त्यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो आहेत.  मुंडे हेच मेन आका असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी धाराशिवच्या आक्रोश मोर्चातून केला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शनिवारी हा मोर्चा निघाला. आमदार धस म्हणाले, तुमच्या खंडणीआड आल्याने हत्या केली. तत्पूर्वी, खंडणीची तक्रार घेऊ नका म्हणून पोलिसांना आकाने फोन केले.

आकालाही (वाल्मीक कराड) मोक्का लागला पाहिजे. त्याने बीडच्या महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून १० लाख खर्च करून ५ कोटी सरकारी तिजोरीतून काढून खिशात घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा दुरान्वयेही संबंध नाही, असे म्हटल्याचे सांगत मुंडे दिवसा माणसे मारत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढा. तुमचे वागणे बरे नाही, असे धस म्हणाले.

मानवाधिकार आयोगात गुन्हाकेज : सरपंच हत्येप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात गुन्हाही नोंद झाला. खासदार बजरंग सोनवणे यांनी ३ जानेवारीला आयोगात तक्रार दिली.

आई तुळजाभवानी तूच न्याय दे : वैभवीसरपंच देशमुख यांची कन्या वैभवी म्हणाली, माझ्या वडिलांची हत्या होऊन महिना झाला. अजून न्याय मिळत नाही. आई तुळजाभवानी तूच न्याय दे. दुष्टांचा संहार कर. तर, खून व खंडणीतील आरोपी एकच आहेत. सर्वांवर मोक्का लावा, अन्यथा आम्ही हे राज्य बंद पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

वाल्मीकच्या मुलासह तिघांविरुद्ध तक्रारसोलापूर : परळी येथे राहत असताना आपले दोन बल्कर ट्रक, दोन कार व जागा अनिल मुंडे याच्या नावावर वाल्मीक कराड यांचा मुलगा सुशील याने बळजबरीने खरेदी केल्याची तक्रार सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाली.

८ आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली. पण खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला मोकळे कसे ठेवले, कराडने व्हिडीओ कॉलवर देशमुख यांची हत्या पाहिली आहे. वाल्मीक कराडला कोण वाचवत आहे?     - अंजली दमानिया,     सामाजिक कार्यकर्त्या

हे प्रकरण राजकीय भूमिका घेण्यापेक्षा संवेदनशील पद्धतीने हाताळले असते तर बरे झाले असते. आ. सुरेश धस यांनी या घटनेची ज्या पद्धतीने मांडणी केली, त्यामुळे बीड बदनाम झाले. बीडचे लोक स्वाभिमानी आहेत.     - पंकजा मुंडे, मंत्री,     पर्यावरण आणि पशुसंवर्धन

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडेwalmik karadवाल्मीक कराडdharashivधाराशिवBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण