संभाजी विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST2021-07-21T04:22:25+5:302021-07-21T04:22:25+5:30
मंगरूळ : कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील संभाजी विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा ...

संभाजी विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
मंगरूळ : कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील संभाजी विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील ४९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये ३६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण, ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर दोघे द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. यात सादिया पठाण, श्रुती माळी, सुप्रिया शिंदे, नेहा घाडगे, सबा शेख, स्वप्नाली रितापुरे, निकिता जगताप, कार्तिक जाधव, कोमल गायकवाड, नर्गिस शेख, सानिका जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अच्युतराव पाटील, टेकाळे, भागचंद बागरेचा, माने यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी अच्युतराव पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून भागचंद बागरेचा, उपसरपंच सुधाकर पानढवळे, अमोल शिंदे, प्रशांत कांबळे, हनुमंत शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक गिरे, सूत्रसंचालन चिलवंत यांनी केले. आभार बनसोडे यांनी मानले.