राष्ट्रवादीच्या तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:29 IST2021-04-14T04:29:55+5:302021-04-14T04:29:55+5:30
कळंब : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यांत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलित करून गरजूंना उपलब्ध करून द्यावे यासाठी येथील ...

राष्ट्रवादीच्या तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक
कळंब : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यांत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलित करून गरजूंना उपलब्ध करून द्यावे यासाठी येथील वसंतराव काळे संगणक महाविद्यालयात तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शुक्रवारी येथे रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय झाला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे होते. यावेळी १६ एप्रिलला येथील नगरपरिषदेच्या परिसरात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलित करून शासकीय ब्लड बँकेत जमा करण्याचे ठरले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, कार्यकारिणी सदस्य धनंजय गंभीरे, पंचायत समितीचे उपसभापती गुणवंत पवार, शहराध्यक्ष मुत्सदिक काझी, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब कथले, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पवार, तालुकाध्यक्ष पद्माकर पाटील, कार्याध्यक्ष उमेश मडके, औदुंबर धोंगडे, सचिव समाधान बाराते, अजय जाधव, राहुल कसबे, अतुल धुमाळ, अविनाश घोडके, संदीप मोरे, महादेव ईटेकर, सौरभ मुंडे, उमेश आडसूळ आदी उपस्थित होते.