मराठा क्रांती ठाेक माेर्चाची तुळजापुरात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:24 IST2021-06-05T04:24:12+5:302021-06-05T04:24:12+5:30
राणे यांच्या वक्तव्याचा केला निषेध तुळजापूर - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठाेक माेर्चाची शुक्रवारी तुळजापुरात बैठक पार पडली. ...

मराठा क्रांती ठाेक माेर्चाची तुळजापुरात बैठक
राणे यांच्या वक्तव्याचा केला निषेध
तुळजापूर - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठाेक माेर्चाची शुक्रवारी तुळजापुरात बैठक पार पडली. छत्रपती खा. संभाजी राजे ६ जून राेजी जाे काही आदेश देतील, त्यानुसार भूमिका घेतली जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यानंतर भाजपाचे खा. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नाेंदविला.
सहा जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती संभाजी राजे यांनी सकल मराठा बांधवांना रायगडाकडे कूच करावी, असे आवाहन केले हाेते. त्यानुसार राज्यसमन्वयक सज्जनराव साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक व मराठा आरक्षणासाठी रायगड किल्ल्यावर तालुक्यातून शंभर गाड्या घेऊन जाण्याचे ठरले हाेते. परंतु, छत्रपती संभाजी राजे यांनी काेविड-१९ च्या संकटामुळे शिवराज्याभिषेक दिन आपापल्या घरीच साजरा करावा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे रायगडावर जाण्याचे नियाेजन रद्द केले. शिवराज्याभिषेक दिन साेहळा घरीच साजरा करण्याचे ठरले, असे साळुंके यांनी बैठकीत सांगितले. ६ जून राेजी छत्रपती खा. संभाजी महाराज जाे आदेश देतील, त्यानुसार पुढे जाण्याचेही यावेळी ठरले. दरम्यान, भाजपाचे खा. नारायण राणे यांनी छत्रपती खा. संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नाेंदविण्यात आला. बैठकीस राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके, आबासाहेब कापसे, महेश गवळी, प्रशांत आपराध, जीवनराजे इंगळे, प्रतीक रोचकरी, ऋतुराज भोसले, मयूर कदम, अजय साळुंके आदी उपस्थित हाेते.