भाजपा पदाधिकाऱ्यांची उमरगा येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:01 IST2021-02-21T05:01:36+5:302021-02-21T05:01:36+5:30
उमरगा : भारतीय जनता पार्टीच्या तालुका शाखेच्या वतीने पक्ष विस्तारासाठी मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी, ...

भाजपा पदाधिकाऱ्यांची उमरगा येथे बैठक
उमरगा : भारतीय जनता पार्टीच्या तालुका शाखेच्या वतीने पक्ष विस्तारासाठी मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली. यावेळी नूतन भाजपा कार्यकर्त्यांचा व सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीस जिल्हाध्यक्ष नितीन काळे, हर्षवर्धन चालुक्य पाटील, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, प्रदीप शिंदे, दिलीपसिंह गौतम, सिद्धेश्वर माने, सुनील कुलकर्णी, राजू मिनियार, अनिल बिराजदार, अभिषेक पवार, गुलाब डोंगरे, निसार याकूब मदार शेख, विठ्ठल चिकुंद्रे, पंकज मोरे, गणेश डोंगरे आदी उपस्थित होते.
(फोटो कॅप्शन २०)
उमरगा तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल आकाश जाधवर यांचा सत्कार करताना भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा नेते हर्षवर्धन चालुक्य पाटील, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, आदी.