नगराध्यक्ष प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:32 IST2021-01-03T04:32:04+5:302021-01-03T04:32:04+5:30

उस्मानाबाद - येथील श्री तुळजाभवानी स्टेडियमवर नगराध्यक्ष प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस थाटात प्रारंभ झाला. या स्पर्धा गाजी स्पाेर्ट्स क्लबच्या ...

Mayor begins Premier League cricket tournament | नगराध्यक्ष प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

नगराध्यक्ष प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

उस्मानाबाद - येथील श्री तुळजाभवानी स्टेडियमवर नगराध्यक्ष प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस थाटात प्रारंभ झाला. या स्पर्धा गाजी स्पाेर्ट्स क्लबच्या वतीने घेण्यात येत असलेल्या या स्पर्धा ८ जानेवारीपर्यंत चालणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर उस्मानाबादेत नगराध्यक्ष प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येते. यंदा १ ते ८ जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा हाेता आहे. स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवादही साधला. स्पर्धेत आठ संघांचे १०४ खेळाडू सहभागी झाले आहेत. दरम्यान, कोरोना महामारीत लोकांची निस्वार्थ सेवा करणाऱ्या कोरोना वाॅरिअर्सना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी, मैनुद्दीन पठाण, नगरसेवक निजामुद्दीन मुजावर, तुषार निंबाळकर, सुजित ओव्हाळ, गणेश खोचरे, मौलाना जाफर अली खान, हाफिज अलिमोद्दीन, इस्माईल शेख आदी उपस्थित हाेते.

Web Title: Mayor begins Premier League cricket tournament