शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
3
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरणाची प्रकरणे व विविध योजनांचे अर्ज येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात २०१८ पासून ...

उस्मानाबाद : इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरणाची प्रकरणे व विविध योजनांचे अर्ज येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात २०१८ पासून प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी स्वतंत्र मजूर जनरल बांधकाम कामगार संघटनेने सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाकडे जानेवारी २०२१ पासून नोंदणी व नूतनीकरण अर्ज व २०१८ पासून विविध योजनांचे अर्ज प्रलंबित आहेत. या संदर्भात संघटनेमार्फत वारंवार चर्चा व निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. परंतु, संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे ती प्रकरणे धूळखात पडली आहेत. विशेष म्हणजे, एक त्रुटी पूर्ण केली की लगेच दुसरी नवीन त्रुटी टाकली जाते. त्यामुळे कामगारांचा वेळ आणि पैसा वाया जातो. तसेच सहाय्यक आवश्यक असलेली कागदपत्रे स्पष्ट असताना सुद्धा अस्पष्ट असा शेरा दिला जातो. ज्या कागदपत्रांची आवश्यकताच नाही अशी कागदपत्रे मागितली जातात.

नोंदणी नूतनीकरणाचे अर्ज निकाली काढताना येथील अधिकाऱ्यांचे एकमत होत नसल्यामुळे कामगारांची कामे खोळंबली असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

सुरक्षा संच व अत्यावश्यक संच आणि आरोग्य तपासणी होऊन एक वर्ष होऊनही कामगारांना अद्यापपर्यंत संच देखील वाटप करण्यात आलेले नाहीत. कामगारांचे प्रश्न येत्या १५ दिवसांमध्ये न सोडविल्यास या कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने हलगीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भालेराव, दादा गवळी, एजाज सय्यद व परमेश्वर वाघमारे यांच्या सह्या आहेत.