साठा संपल्याने अनेकजण लसीकरणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:34 IST2021-04-20T04:34:01+5:302021-04-20T04:34:01+5:30
समुद्रवाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गोरोबाकाका नगर, सांजा, वाघोली, शिंदेवाडी, सारोळा, दारफळ, राजुरी, कामेगाव, सांगवी, लासोना व समुद्रवाणी अशा अकरा ...

साठा संपल्याने अनेकजण लसीकरणापासून वंचित
समुद्रवाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गोरोबाकाका नगर, सांजा, वाघोली, शिंदेवाडी, सारोळा, दारफळ, राजुरी, कामेगाव, सांगवी, लासोना व समुद्रवाणी अशा अकरा गावांचा समावेश आहे. सध्या सांजा, शिंदेवाडी व कामेगाव येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वच गावातील नागरिक उत्स्फूर्तपणे लसीकरण करून घेत आहेत. सोमवारीदेखील लसीकरणासाठी येथे मोठी गर्दी झाली होती. परंतु, या आरोग्य केंद्राला लसीचे केवळ १०० डोस उपलब्ध झाले होते. दुपारी २ वाजताच हे डोस संपले. त्यामुळे उर्वरित नागरिकांना लस न घेताच परतावे लागले. त्यामुळे प्रशासनाने येथे मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
चाैकट......
तांत्रिक त्रुटींचा बसला फटका
यापूर्वी फ्रंटलाइन वर्कर्सला येथे लसीकरण करण्यात आले. यात पोलीसपाटील, शिक्षक आदींचा समावेश होता. परंतु, या वेळीही संगणकातील सॉफ्टवेअरने आधार कार्ड व ओळखपत्र स्वीकारले नसल्यामुळे राजुरी येथील महिला पोलीसपाटील यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. त्यामुळे अशा तांत्रिक त्रुटी दूर करण्याची गरजही व्यक्त होत आहे.