शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

दारू पिऊन शिवीगाळ केल्याने सासऱ्याने केला जावयाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 6:11 PM

दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या कारणावरून सासरा, मेहुण्याने शेजारील शेतकऱ्याच्या मदतीने जावयाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

कळंब (उस्मानाबाद ) : दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या कारणावरून सासरा, मेहुण्याने शेजारील शेतकऱ्याच्या मदतीने जावयाचा खून केल्याची घटना ९ आॅक्टोबर रोजी तालुक्यातील कोठाळवाडी शिवारातील टोकणी पारधीपेढी येथे घडली. याप्रकरणी मयताच्या भावाने रविवारी कळंब पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर तिघांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आप्पा देवराज काळे (वय ४५) हे तालुक्यातील कोठाळवाडी येथील टोकणी पारधी पेढी येथील सासूरवाडीत रहायला होते. ९ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते दारू पिऊन शिवीगाळ करीत असल्याने त्यांचा सासरा दिगांबर शामराव शिंदे याने दोरीने त्याचे हात-पाय बांधले व मेहुणा कल्याण दिगंबर शिंदे याने केबलने मारहाण केली. या आवाजाने शेजारील शेतकरी प्रल्हाद गोडगे तेथे आला. त्याने बाजुला पडलेल्या कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केली. तसेच कल्याणनेही पुन्हा लोखंडी रॉडने आप्पाला मारले व त्यांना तेथेच टाकून सर्वजण निघून गेले. 

दुसऱ्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास आप्पा मयत झाला, असे समजून दिगांबर व कल्याण याने त्याला ओढत बाजुच्या पिवळीच्या पिकात टाकले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हावरगाव येथील अंबादास जाधव यांच्या बैलगाडीमध्ये मयत आप्पाराव यास ईटकूर ते पारा रोडच्या कडेला नेऊन टाकले.

ही बाब आपणास पारधी पेढीवरील महिलेने सांगितली. तसेच भाऊ मयत झाल्याची माहिती पारधी पेढीवरील परमेश्वर शिंदे याने दिल्याचे मयत आप्पाराव याचा भाऊ उमराव देवराव काळे (वय ५५, रा. शिंदोदा, ता. जि. बीड) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून मयत आप्पाराव यांचा सासरा दिगांबर, मेहुणा कल्याण व शेजारील शेतकरी प्रल्हाद गोडगे या तिघांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपाधीक्षक डॉ. नितीन कटेकर करीत आहेत.