महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मिसाळ निलंबित

By Admin | Updated: September 19, 2014 01:00 IST2014-09-19T00:53:25+5:302014-09-19T01:00:15+5:30

परंडा : बेकायदेशीर कामे करणा-या गुत्तेदारांना अभय देऊन सबंधित लाईनमनवर कारवाई न करता हे प्रकरण दडपूण ठेवल्याप्रकरणी परंडा उपविभागीय महावितरण

Mahavitaran's deputy executive engineer suspended | महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मिसाळ निलंबित

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मिसाळ निलंबित


परंडा : बेकायदेशीर कामे करणा-या गुत्तेदारांना अभय देऊन सबंधित लाईनमनवर कारवाई न करता हे प्रकरण दडपूण ठेवल्याप्रकरणी परंडा उपविभागीय महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता एस एन मिसाळ यांच्यावर अधिक्षक अभियता अरुण पापडकर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुत्तेदारासह महावितरणातील अधिकारी कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील सिना कोळेगाव धरण परिसरात बेकायदेशीरित्या विद्यूत लाईन ओढून रोहीत्र बसवण्यात आल्याची तक्रार काही लोकांनी वरिष्ठाकडे केली होती. या तक्रारीवरुन वरिष्ठानी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी वेळी सबंधीत गुत्तेदारानी रोहीत्र उभारणीकरीता उपकार्यकारी अभियंता यांची मंजूरी घेणे आवश्यक होते मात्र मंजूरी न घेताच सबंधीत गुत्तेदाराने महावितरणच्या अधिकारी व कर्मचा-याशी संगणमत करुन सात रोहीत्र बेकायदेशीररित्या बसवून नियमबाह्य पद्धत्तीने विज जोडणी केल्याचे चौकशी दरम्यान उघडकीस आले. हा चौकशी अहवाल वरिष्ठाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, ३६ शेतकऱ्यासह गुत्तेदार गणेश फले याच्याकडे परवाना नसल्याने एकूण ३७ जणावर चार महिन्यापुर्वी लातूर येथील महावितरणच्या पोलीस ठाण्यामध्ये चोरी कायदा कलम २००३ नुसार कलम १३५, १२६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी अनाधिकृतपणे रोहीत्र बसवून विज चोरी केल्याप्रकरणी महावितरणने ३६ शेतकऱ्यांना चार लाखाचा दंडही ठोठावला होता. चौकशी अहवालात दोन गुत्तेदारासह आपल्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीरित्या रोहीत्रांची उभारणी झाली असतानाही या बेकायदेशीर कामाची माहीती वरिष्ठांना न देता ती दडवून ठेवल्याप्रकरणी लाईनमन भगवान केशव मोरे, हकीम महेबुब मुजावर यांना दोषी धरण्यात आले होते. हे प्रकरण गांर्भियाने घेत अधिक्षक अभियंत्यानी गुत्तेदारावर गुन्हे तर दोषी लाईनमनवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मिसाळ यांना दिले होते. मात्र सबंधीत गुत्तेदारावर गुन्हे तर दोषी लाईनमन वर कारवाई करण्यास मिसाळ यांनी विलंब लावल्याने कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अधिक्षक अभियंता पापडकर यांनी उप कार्यकारी अभियंता मिसाळ यांना निलंबीत केले आहे. उप कार्यकारी अभियंता मिसाळ यांना १६ तारखेला अधिक्षक अभियंता कार्यालयात बोलावून त्यांच्या हातात निलंबनाच्या कारवाईचे पत्र दिले. मात्र मिसाळ यांच्या निलंबनाचे पत्र अद्यापर्यत आमच्या कार्यालयाकडे प्राप्त न झाल्याचे परंडा महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले. मिसाळ यांच्या जागी कार्यालयाचा प्रभारी कारभार भूम महावितरण कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Mahavitaran's deputy executive engineer suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.