शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

Maharashtra Election 2019 : उस्मानाबादेत इच्छुकांनी पक्षांतर करून ठोकला शड्डू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:44 IST

कुठे तिरंगी, तर कुठे चौरंगी लढतीची शक्यता

ठळक मुद्देकाहींनी बंडाचे निशाण फडकावीत ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली

- चेतन धनुरे

उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चारही मतदारसंघांतील प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत नामनिर्देशन दाखल केले. प्रयत्न करूनही उमेदवारी न मिळाल्याने काहींनी बंडाचे निशाण फडकावीत ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली, तर काहींनी पक्षांतर करीत शड्डू ठोकला आहे. त्यामुळे उस्मानाबादेत कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढती होणार, हे निश्चित झाले आहे.

उस्मानाबाद मतदारसंघामध्ये शिवसेना महायुतीच्या वतीने कैैलास पाटील यांनी शुक्रवारी दुपारी रॅली काढून नामनिर्देशन दाखल केले. परंतु, यावेळी महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी चार हात दूर राहणेच पसंत केले. हे थोडके म्हणून की काय, उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यामुळे पिंगळे उमेदवारी कायम ठेवतात की मागे घेतात, यावर कैैलास पाटील यांच्या विजयाचे गणित बऱ्यापैैकी अवलंबून आहे.दुसरीकडे स्व:पक्षातील इच्छुकांना बाजूला सारत सेनेतून राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले संजय निंबाळकर यांना उमेदवारी बहाल केली आहे. परंतु, यावेळी शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली.

परंडा मतदार संघातून शिवसेना महायुतीच्या वतीने प्रा. तानाजी सावंत यांनी रॅली काढून उमेदवारी दाखल केली. उमेदवारी न मिळाल्याने सावंत यांचे कट्टर समर्थक सुरेश कांबळे यांनी तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून नामनिर्देशन दाखल केले. राष्ट्रवादीच्या वतीने पुन्हा आमदार राहुल मोटे मैैदानात आहेत. त्यामुळे सुरेश कांबळे यांचा फटका प्रा. सावंत यांना बसतो की आ. मोटेंना हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

उमरगा मतदारसंघातून आमदार बसवराज पाटील यांचे कट्टर समर्थक दिलीप भालेराव यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे. तर काँग्रेसकडून इच्छूक असलेले जालींदर कोकणे यांनी उमेदवारी न मिळाल्याने मनसेचा झेंडा हाती घेत निवडणूक आखाड्यात उडी घेतली. शिवसेनेने विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना पुन्हा मैैदानात उतरविले आहे.  वंचितनेही येथून तगडे आव्हान निर्माण केले आहे. रमाकांत गायकवाड यांना रॅली काढून उमेदवारी नामनिर्देशन दाखल केले. त्यामुळे येथेही तिरंगी लढत जवळपास निश्चित मानली जात आहे.

तुळजापूर विधानसभा...  तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा एकदा आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवीत निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले राणाजगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे.  दुसरीकडे राष्ट्रवादीतून बाहेर पडत अशोक जगदाळे  वंचित बहुजन आघाडीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनीही शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादीतीलच महेंद्र धुरगुडे यांनीही प्रहार पक्षात प्रवेश करीत उमेदवारी दाखल केली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Osmanabadउस्मानाबादosmanabad-acउस्मानाबादtuljapur-acतुळजापूरparanda-acपरांडाumarga-acउमरगा