शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : एक रुपयात तुमचेही डोके तपासून देऊ; उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:39 IST

गरज असेल तर या योजनेतून आम्ही तुमचीही डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करु

उस्मानाबाद : आम्ही आमच्या वचननाम्यात १ रुपयात आरोग्य तपासणीची घोषणा केली आहे़ मात्र, हे (शरद पवार) त्यावरही ओरडत सुटले आहेत़ हा निव्वळ विघ्नसंतोषीपणा आहे़ गरज असेल तर या योजनेतून आम्ही तुमचीही डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करु, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लगावला़ 

महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोमवारी उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादेत सभा घेतली़ यावेळी त्यांनी शरद पवारांसह अजित पवारांवरही जोरदार हल्ला चढविला़ १० रुपयांत थाळी या सेनेच्या घोषणेवर पवारांनी केलेल्या टिप्पणीसही ठाकरे यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले़ ते म्हणाले, तुमच्या काळात तर गोरगरिबांच्या जेवणाची सोय केली नाही़ तेव्हा आम्ही करतोय तर त्यात खड्यासारखे येऊ नका़ नाहीतर काढून फेकून देवू़ आमच्या झुणका भाकर योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे ते म्हणताहेत़ आम्ही केंद्र चांगले चालवत होते़ मात्र, या करंट्यांनी सत्तेत येताच ही योजना बंद पाडली़ कारण त्यात यांना काही खाता येत नव्हते़ सर्वसामान्यांना खाऊ घालायचे सोडून हे त्यांचीच पोटं भरत सुटले होते, अशी टीकाही ठाकरे यांनी केली़

अजित पवारांवरही घणाघात़बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणे ही आमची चूक होती, तेव्हाचे विभागप्रमुख ऐकत नव्हते, असे अजित पवार आता म्हणाताहेत़ मग तुमच्या विमानाचे पायलट शरद पवार तेव्हा काय करीत होते? कोर्टाने तुमच्या पेकाटात लाथ घातली म्हणून तुम्ही वाचले़ नाहीतर राज्यभर आगडोंब उसळला असता आणि त्यात तुम्ही खाक झाले असते़ ती जर तुम्हाला आता चूक वाटत असेल तर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागावी, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर केला़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019osmanabad-acउस्मानाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार