शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरात माजी मंत्र्यांची ‘फाईट’ तर उस्मानाबादेत ‘पिक्चर अभी बाकी है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 17:09 IST

महायुतीत भाजपकडे तुळजापूर हा एकमेव मतदारसंघ आहे़

ठळक मुद्देउस्मानाबादचा आखाडा अजूनही रिकामाच

- चेतन धनुरे

उस्मानाबाद : नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास आता तीन दिवसांचाच अवधी राहिलेला असताना उस्मानाबादेत उमेदवारीसाठी जबरदस्त चुरस रंगली आहे़ एकीकडे तुळजापूर व परंड्याचे पहेलवान ठरलेले असतानाही उस्मानाबादचा आखाडा अजूनही रिकामाच आहे़  उस्मानाबादइतकीच तुळजापुरात लक्षवेधी लढत होणार आहे़ 

महायुतीत भाजपकडे तुळजापूर हा एकमेव मतदारसंघ आहे़ त्यामुळे नुकताच भाजप प्रवेश केलेले माजीमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापुरातून उमेदवारी देण्यात आली़ दुसरीकडे या मतदारसंघावर दीर्घकाळ वर्चस्व राखलेले माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेसने पुन्हा आखाड्यात उतरविले आहे़ शिवाय, तगडे अपक्ष व बंडखोरीमुळे तुळजापूरचा आखाडा रंगणार आहे़ 

परंडा मतदारसंघाचेही चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे़ येथून विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे राहुल मोटे हे सलग तीनवेळा निवडून गेले आहेत़ त्यांना शिवसेनेने यावेळी जलसंधारण मंत्री प्रा़ तानाजी सावंत हे आव्हान देणार आहेत़ एरवी सेनेतील बंडखोरी पथ्यावर पडणाऱ्या राष्ट्रवादीला सावंतांमुळे तगडे आव्हान पेलावे लागणार आहे. खुद्द मंत्रीच येथून आखाड्यात उतरल्याने सेना मोठी ताकद लावणार, हे निश्चित़ त्यामुळे परंड्याची लढतही लक्षवेधी असणार आहे़  

उमरगा मतदारसंघात शिवसेनेने दोन टर्म आमदार राहिलेल्या ज्ञानराज चौगुले यांच्या पारड्यात पुन्हा उमेदवारीचे माप टाकले आहे़ येथून काँग्रेसने दिलीप भालेराव यांना उमेदवारी जाहीर केली आहे़ कॉँग्रेसने मंगळवारी उशिरा जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर केले आहे. 

उस्मानाबादेत राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला?उस्मानाबादेत राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही़ शिवसेनेतही उमेदवारीवरुन धुसफूस सुरू होती़ मंगळवारी उशिरापर्यंत पुण्यात उमेदवारीवर खल सुरू होता़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019tuljapur-acतुळजापूरOsmanabadउस्मानाबादosmanabad-acउस्मानाबाद