शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘उधर से लोंढा आया, और सबीच बह के गया...’, केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 04:41 IST

Osmanabad : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा या भागात सर्वाधिक नुकसान झाले होते.

उस्मानाबाद : ‘उधर से पानी का लोंढा आया, और सबीच बह के गया... कुछ भी नही बचा... देखो तुमीच, तुम्ही माई-बाप है अब... कुछ मदद दिला देव...’ ही कळवळीची भावना आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची... तोडक्या-मोडक्या हिंदीतच सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांपुढे आपल्या भावना अन् अडचणी मांडत मदतीसाठी साकडे घातले.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा या भागात सर्वाधिक नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी केंद्रीय पथकातील उपसचिव यशपाल व अभियंता असलेले तुषार व्यास सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले. पाहणीची सुरुवात त्यांनी उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथून केली.

या ठिकाणी पूरसदृश स्थितीने शेतीची झालेली अवस्था त्यांनी पाहिली. खरडून गेलेल्या जमिनी, गाळाने बुजलेल्या विहिरी, उखडून गेलेली पाइपलाइन, शेतात साचलेली वाळू, दगड-गोटे या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यानंतर त्यांनी पाटोदा येथेही पाहणी केली. 

पथक केशेगाव येथील रखमाजी डोलारे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करीत होते. अतिवृष्टीने नुकसान झाल्याने ऊस कारखान्याला गेला नव्हता. त्यामुळे त्यास तुरा फुटला. व्यास यांना त्याबद्दल कुतूहल वाटले. त्यांनी ‘इस गन्ने पे ये दुसरा क्या लगा है’, असे विचारले. त्यावर ऊस परिपक्व झाल्यावर तुरा फुटतो. ताे उसाचाच भाग असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जालना, औरंगाबाद जिल्ह्यातही पाहणीजालना : केंद्रीय पथकाने सोमवारी जिल्ह्यातील पाच ते सात गावांना भेट दिली. औरंगाबादहून प्रथम या पथकाने बदनापूर तालुक्यातील वाकुळणी, रोषणगाव, हिरवा या गावांना भेटी दिल्या, तसेच जालना तालुक्यातील नंदापूर आणि जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला या पथकाने भेट दिली.  दरम्यान, या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आणि गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्याही भेटी घेतल्या. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही पाहणी केली होती, तीच मदत आणखी मिळाली नाही, आता तुम्ही कधी अहवाल देणार आणि कधी नुकसानभरपाई मिळणार, असे प्रश्न पथकाला करण्यात आले, परंतु यावर पथकातील अधिकाऱ्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी