शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

lok sabha election 2019 : नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली तरी उमेदवारीवर अडले घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:15 IST

हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्याची मागणी करण्यात आली आहे़

- चेतन धनुरे  

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ अजूनही संपुष्टात आलेला नाही़ मंगळवारपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरु असतानाही इच्छुकांसह राजकीय कार्यकर्त्यांच्याही नजरा मुंबईकडेच लागून आहेत़ युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे

सेनेचे विद्यमान खासदार प्रा़ रवींद्र गायकवाड यांच्याविरोधातील एक गट प्रबळ बनल्याने त्यांच्या उमेदवारीस जोरदार विरोध आहे़ त्यामुळे सेनेची उमेदवारी पक्षप्रमुखांनी अद्याप लटकूनच ठेवली आहे़ सातत्याने चकरा मारून झाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात दोन्ही गटांचे पदाधिकारी मुंबईतच तळ ठोकून आहेत़ सेनेतील या कुरघोड्या पाहून भाजपनेही स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत जोर लावला आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीतही संभ्रमच आहे़ आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीच लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह वरिष्ठ पातळीवरुन आहे़ शिवाय, जि़प़ उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्याही नावावर चर्चा घडविली जात आहे़ 

काँग्रेससाठी आग्रहलातूर व उस्मानाबादच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्याची मागणी करण्यात आली आहे़ दरम्यान, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडेल, अशी चिन्हे अजून तरी दिसत नाहीत़ एकंदर, युती व आघाडीचे घोडे उमेदवारीवरुनच अडल्याचे चित्र आजघडीला मतदारसंघात आहे़ उमेदवारीच जाहीर नसल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीला अद्याप गती मिळालेली नाही़  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Osmanabadउस्मानाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना