उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजाबद्दल लोहारा नगरपंचायतला राज्यात द्वितीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2023 21:39 IST2023-04-20T21:36:47+5:302023-04-20T21:39:19+5:30
मुंबई येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार

उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजाबद्दल लोहारा नगरपंचायतला राज्यात द्वितीय पुरस्कार
लोहारा ( जि.धाराशिव ) : महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग दिनानिमित्त राज्यातील नगरपरिषद ,नगरपंचायतमध्ये नगरपंचायत क्षेत्रात उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजाबद्दल लोहारा नगरपंचायतला राज्यात द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
लोहारा नगरपंचायत क्षेत्रामध्ये सन २०२२-२३ या वर्षात शासकीय कामांची व योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करणे, नगरपंचायत उत्पन्न वाढीसाठी कर संकलन , विविध क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या सर्व कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग दिनानिमित्त गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात लोहारा नगरपंचायतला राज्यात द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
लोहारा शहराला सर्वांग सुंदर शहर बनवण्यासाठी व प्रशासकीय कामकाजामध्ये योगदान देणाऱ्याचे यापुढे ही असेच सहकार्य राहावे असे आवाहन लोहारा नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी केले आहे.